IND vs AUS 1st T20I match overs reduced due to 11 PM lights-out rule, not rain
esakal
Australia vs India 1st T20I Marathi News : पावसाच्या बॅटिंगमुळे क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला ट्वेंटी-२० सामना कॅनबेरा येथे खेळवला जातोय. पण, ९ षटकांत दोन वेळा पावसाने खोडा घातला. पहिल्यांदा पाऊस पडल्याने षटकांची संख्या कमी झाली आणि सामना प्रत्येकी १८ षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला. आता पुन्हा पाऊस आल्याने षटकांची संख्या आणखी कमी होईल हे निश्चित आहे. पण, षटकं कमी होण्यामागे पाऊसच कारण नाही, तर भलतंच कारण आहे.