
IND vs AUS 2nd Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये येत्या ६ डिसेंबरपासून ॲडलेड येथे दिवस-रात्र कसोटी खेळवण्यात येणार आहेत. पिंक बॉल कसोटीत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कसोटीततील पहिल्या दिवशी वादळी वाऱ्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता ढगाळ वातावरणासह ४७% टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे व दुपारी १ वाजता वादळी वाऱ्यासह ५१ % पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
क्युरेटर डॅमियन हॉग यांनी ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता व्यक्त केली आहे. हे वादळ पहिल्या दिवशी अर्थातच शुक्रवारी येईल, पण शनिवारपासून कसोटीत पूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकेल, अशी आशाही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.