Arshdeep Singh Strikes Early but Team David and Stoinis Turn the Game Around
esakal
Australia vs India 3rd T20I Live Marathi Cricket Update: अर्शदीप सिंगला ( Arshdeep Singh) अखेर संधी मिळाली आणि त्याने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये दोन धक्के देत भारताला चांगली सुरुवातही करून दिली. पण, सूर्यकुमार यादवने डावपेच बदलेल आणि गोलंदाजीत केलेला बदल ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडला. टीम डेव्हिड ( Tim David ) व मार्कस स्टॉयनिस यांनी वादळी खेळी करताना भारतासमोर मोठे आव्हान उभे केले. कुलदीप यादवच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवलेल्या वॉशिंग्टन सुंदरकडून एकही षटक फेकून घेतले गेले नाही. उलट अभिषेक शर्माला एक षटक दिले गेले आणि याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.