
Border Gavaskar Trophy 2024-25: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पावसाच्या माऱ्यात टीम इंडियाच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याचे स्वप्न वाहून जाण्याची चिन्हे आहेत. पर्थ कसोटी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन करून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. विजयाची चव चाखल्यानंतर त्यांची भूक अधिक वाढते, हे यापूर्वीही पाहायला मिळाले आहे आणि आताही तेच दिसतेय. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत भारताला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले आहे. आघाडीच्या फलंदाजांचे अपयश या मालिकेत भारतासाठी डोकेदुखी ठरतेय...