IND vs AUS: रोहित शर्माचा पारा चढला! जैस्वालला एकट्यालाच सोडून टीम इंडिया एअरपोर्टला पोहचली

Australia vs India 3rd Test Brisbane: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनला तिसरा कसोटी सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला बुधवारी ऍडलेडवरून ब्रिस्बेनला पोहचायचं होतं. यावेळी यशस्वी जैस्वालमुळे रोहित शर्माचा पारा चढल्याचे समजत आहे.
Australia vs India Test
Yashasvi Jaiswal | Rohit Sharma.jpgSakal
Updated on

Australia vs India Test: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. आता या कसोटी मालिकेतील तिसरा सामना भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमधील द गॅबा या मैदानावर खेळायचा आहे. त्यामुळे भारतीय संघाला बुधवारी (११ डिसेंबर) ऍडलेडवरून ब्रिस्बेनला पोहचायचं होतं.

भारताने ऍडलेडला या कसोटी मालिकेतील दुसरा सामना अवघ्या अडीच दिवसातच गमावला. ऑस्ट्रेलियाने दिवस-रात्र पद्धतीने झालेल्या या सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, हा सामना अडीच दिवसच चालल्याने खेळाडूंना ज्यादाचे २ दिवस विश्रांती मिळाली.

Australia vs India Test
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची क्रेझ; ‘बॉक्सिंग डे’ची तिकीटविक्री हाउसफुल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com