
Rohit Sharma will missed Melbourne test? भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चौथा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. तीन सामन्यानंतर मालिका १-१ अशी बरोबरीत असताना WTC Final साठी भारताला उर्वरित दोन्ही लढती जिंकणे महत्त्वाच्या आहेत. पण, भारतासमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर काल सराव सत्रात लोकेश राहुलच्या बोटाला दुखापत झाली आणि आज कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या गुडघ्याला जोरात चेंडू लागला.