Abhishek Sharma - Shubman Gill | Australia vs India 5th
Sakal
Cricket
AUS vs IND, 5th T20I: मॅक्सवेलने झेल सोडला अन् अभिषेक शर्माने इतिहास घडवला; सूर्यकुमार अन् केएल राहुलला टाकलं मागे
Abhishek Sharma Fastest Batter to Reach 1000 T20I Runs: गॅबामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पाचवा टी२० सामना सुरू आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने ११ वी धाव काढताच इतिहास घडवला आहे.
Summary
ब्रिस्बेनमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया टी२० सामन्यात अभिषेक शर्माने इतिहास रचला.
२५ वर्षीय अभिषेकने ५२८ चेंडूत १००० धावा पूर्ण करत सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला.
भारताने ४.५ षटकात बिनबाद ५२ धावा केल्या असताना वादळामुळे सामना थांबवण्यात आला.

