
IND vs AUS Test Series : अॅडिलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला. ज्यामध्ये पहिल्या डावात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारताचे ६ विकेट्स घेतले, तर दुसऱ्या कसोटीत कर्णधार पॅट कमिंसला ५ विकेट्स घेण्यात यश आले. त्याने १४ षटकांत ५७ धावा देऊन ५ विकेट्स घेत विक्रमी कामगिरी केली.
त्याने नितीश कुमार रेड्डी (४२), केएल राहुल (७), रोहित शर्मा (६), आर अश्विन (७) आणि हर्षित राणाला (०) धावांवर बाद केले.