Phoebe Litchfield celebrates her record-breaking century against India in the ICC Women’s World Cup semi final
ESAKAL
India Women vs Australia Women Semi Final Marathi Cricket News : महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनचा दबदबा पाहायला मिळतोय. कर्णधार एलिसा हिली ५ धावांवर माघारी जरी परतली असली तरी फोएबे लिचफिल्ड ( Phoebe Litchfield ) वादळी शतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. तिच्या सोबतीला एलिसे पेरी ( Ellyse Perry) उभी राहिली आणि १५५ धावांची विक्रमी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने ३३ षटकांत २ बाद २१५ धावा चोपल्या आहेत. लिचफिल्ड ११९ धावांवर माघारी परतली, परंतु तिने वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील अनेक विक्रम नावावर केले.