Rohit Sharma press conference LIVE : भारत-बांगलादेश यांच्यातली पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून चेन्नईत सुरू होणार आहे. त्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोहितने सर्व महत्त्वांच्या मुद्यांवर भाष्य केले..भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ६८.५२ टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे आणि अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी त्यांना आणखी १० कसोटी सामने खेळायचे आहे. दुसरीकडे बांगलादेशने पाकिस्तानला घरात जाऊन २-० असे कसोटीत पराभूत केले. त्यामुळे WTC Standing मध्ये ते ४५.८३ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आले आहेत. बांगलादेशचे मनोबल उंचावले आहे आणि टीम इंडिया त्यांना हलक्यात नक्कीच घेणार नाहीत..प्लेइंग इलेव्हन निवडताना बरेच विचार''जेव्हा आम्ही ११ खेळाडू निवडतो तेव्हा बराच विचार केला जातो. त्यांचे भारतीय क्रिकेटसाठीचं योगदान लक्षात घेतलं जातं. मागील दोन-तीन मालिकांमधील त्यांची कामगिरी कशी झालीय, हेही पाहिले जाते. बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो. आम्ही भारतात शेवटची मालिका जेव्हा खेळलो होतो, तेव्हा बरेच खेळाडू दुखापतीमुळे खेळले नव्हते. पण, आता त्यापैकी बरेच खेळाडू उपलब्ध आहे. ही कसोटी मॅच कशी खेळायचीय आणि कशी जिंकता येईल, त्यानुसार अंतिम ११ खेळाडू निवडले जातील, '' असे रोहित म्हणाला.. बांगलादेश मालिकेबाबत मोठं भाष्य...प्रत्येक सामना हा महत्त्वाचा असतो. बांगलादेश मालिका ही आगामी ऑस्ट्रेलिया मालिकेसाठीची सराव मालिका नाही. आम्हाला WTC चे गुण जिंकायचे आहे. त्यामुळे या सत्राची सुरुवात आम्हाला दणक्यात करायची आहे. त्यामुळे सर्वोत्तम खेळ करण्यावर आमचा भर आहे. जलदगती गोलंदाजांवरील वर्क लोड महत्त्वाचा आहे आणि त्याचे योग्य नियोजन केले जाईल, असेही रोहितने म्हटले. .भारतीय संघ ( पहिल्या कसोटीसाठी) - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयालबांगलादेश कसोटी संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद, जाकेर अली .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.