
IND vs ENG 1st T20I at Kolkata: भारत आणि इंग्लंड संघात टी२० मालिकेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. पहिला टी२० सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात असून भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हन संघात मोहम्मद शमीला संधी देण्यात आलेली नाही. शमी नोव्हेंबर २०२३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. पण त्याची या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.