Gautam Gambhir Galle pitch curator latest update
esakal
India vs Sri Lanka 1st Test Galle pitch report: भारत-श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल येथे खेळवला जाणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना ही मालिका जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यात यजमान म्हणून श्रीलंका पुरेपूर फायदा उचलण्याच्या तयारीत आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) आणि कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) हेही मागे हटण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे या दोघांकडून खेळपट्टीची वारंवार पाहणी केली जात आहे. पण, त्यातही क्युरेटरकडून ( खेळपट्टी तयार करणारा) माईंड गेम खेळला गेलाय आणि त्यामुळे गंभीर व गिल, त्याच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. गौतम नाराज दिसल्याचे स्पष्ट दिसलेय.