IND vs ENG 1st Test: अपेक्षित होतंच... रिषभ पंतवर ICC ची कारवाई; तिसऱ्या दिवशी केलेल्या दोन चुका, आता दुसऱ्या कसोटीत त्याला...

ICC Reprimands Rishabh Pant for Day 3 Breach: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा उप कर्णधार रिषभ पंतवर आयसीसीने कारवाई केली आहे. तिसऱ्या दिवशी पंतने केलेल्या दोन चुकीच्या कृतींमुळे त्याला औपचारिक इशारा (Reprimand) देण्यात आला आहे.
RISHABH PANT REPRIMANDED BY ICC
RISHABH PANT REPRIMANDED BY ICC esakal
Updated on

Rishabh Pant reprimanded by ICC during IND vs ENG 1st Test : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटीचा निकाल आज लागणे अपेक्षित आहे. भारतीय संघाला १० विकेट्स घेऊन इतिहास घडवण्याची संधी आहे, तर इंग्लंडही ३५० धावा करून विजयासाठी प्रयत्नशील आहे. पण, इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटी सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयावर असहमती दर्शविल्याबद्दल भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) फटकारले आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात पंतने आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.८ चे उल्लंघन केले होते, ज्यामुळे त्याला शिस्तभंगामुळे एक डिमेरिट पॉइंट दिला गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com