KL Rahul says he forgot his batting position in last few years : भारत-इंग्लंड कसोटी मालिका रंजक वळणावर आहे. भारतीय संघाला शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली पहिला कसोटी विजय मिळवण्यासाठी पाचव्या दिवशी १० विकेट्स हव्या आहेत. इंग्लंडला ३५० धावा करायच्या आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी लोकेश राहुल व रिषभ पंत यांच्या शतकांनी इंग्लंडला बेजार केले. केएल राहुल हा असा फलंदाज आहे ज्याने दोन्ही डावांमध्ये सर्वात कठीण काळात चांगली फलंदाजी केली. दिवसाचा खेळ संपल्यानंतर, तो पत्रकार परिषदेत आला आणि त्याच्या फलंदाजीच्या स्थितीबद्दल स्पष्ट मत मांडले.