Rishabh Pant equals Sachin Tendulkar’s record of Test centuries overseas
रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटीत दुसरे शतक झळकावले. त्याने पहिल्या डावात १३४ धावांची खेळी केली होती आणि त्यानंतर दुसऱ्या डावात ११८ धावा चोपल्या. दुसऱ्या डावात ३ बाद ९२ असा भारत संघर्ष करत होता आणि रिषभने लोकेश राहुलसह १९५ धावांची भागीदारी केली. KL Rahul ने १३७ धावा केल्या. रिषभच्या खेळीत १५ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. भारताने यजमान इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावा ठेवल्या आहेत. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद २१ धावा केल्या होत्या आणि त्यांना पाचव्या दिवशी ३५० धावा करायच्या आहेत. तेच भारताला १० विकेट्स टिपायच्या आहेत.