Shubman Gill Press Conference : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होतेय. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे आणि आज सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कॅप्टनने इंग्लिश पत्रकारांची बोलती बंद केली. त्याने आत्मविश्वासाने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन इंग्लंडच्या संघाला, आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नका, असा सज्जड दम दिला. यावेळी त्याला आयपीएलची ट्रॉफी जिंकणे की इंग्लंड मालिका, असा प्रश्न विचारला गेला. त्यावरही शुभमनचे गिल मन जिंकणारे आहे.