England substitutes non-squad player in IND vs ENG Test : भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीत सध्यातरी पाहुण्या भारतीय संघाने पकड घेतली आहे. भारताच्या ४७१ धावांच्या उत्तरात इंग्लंडने कडवी टक्कर देताना ४६५ धावांपर्यंत मजल मारली. भारताने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर २ बाद ९० धावा करून ९६ धावांची आघाडी घेतली आहे. पण, या सामन्यात एक असा प्रसंग घडला की ज्यावरून वाद सुरू झाला आहे.