What did Pant say to Jamie Smith in IND vs ENG 2nd Test बर्मिंगहॅमच्या पाटा खेळपट्टीवर दोन्ही संघांकडून धावांचा डोंगर उभा राहिलेला पाहायला मिळतोय. भारताच्या ५८७ धावांच्या प्रत्यु्त्तरात इंग्लंडने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या. त्यानंतर भारताकडून दुसऱ्या डावात ३८३ धावा झाल्या आहेत आणि त्यांनी ५६३ धावांची आघाडी घेतली आहे. शुभमन गिलने द्विशतकानंतर दुसऱ्या डावात दीडशे धावा कुटल्या आहेत. या सामन्यात रिषभ पंतच्या आक्रमक फटकेबाजीने सर्वांचे मनोरंजन केले.