IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

India vs England 2nd Test Marathi News: इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाकडून सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम अखेर मोडला गेला. शुभमन गिलने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक द्विशतक ठोकून १९७९ मध्ये सुनील गावस्कर यांनी केलेला विक्रम मोडला.
SHUBMAN GILL DOUBLE CENTURY
SHUBMAN GILL DOUBLE CENTURY ESAKAL
Updated on

India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : शुभमन गिलने कर्णधार म्हणून त्याची केलेली निवड सार्थ ठरवली आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा तो भारताचा पहिला कर्णधार ठरला. १९९० मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने १७७ धावा केल्या होत्या आणि ती आतापर्यंतची भारतीय कर्णधाराची इंग्लंडमधील सर्वोत्तम खेळी होती. या खेळीसह त्याने अनेक विक्रम मोडले आणि ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांनीही उभं राहून त्याचं कौतुक केलं

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com