India to reshuffle slip cordon as Jaiswal loses fielding trust : भारत-इंग्लंड यांच्यात दुसऱ्या कसोटीला २ जुलैपासून सुरुवात होतेय. जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. पहिल्या कसोटीत भारतीय संघाने बऱ्याच चुका केल्या आणि त्यात सुधारणा करून पुढे जाण्यासाठी खेळाडू सज्ज आहेत. लीड्सवर भारताचे क्षेत्ररक्षण खूपच गचाळ पाहायला मिळाले आणि जवळपास ७-८ झेल टाकले गेले. यापैकी बरेचशे झेल यशस्वी जैस्वालने टाकले आणि त्याचा संघाला खूप मोठा फटका बसला. इंग्लंडच्या १७९ धावा जास्त झाल्या. त्यामुळेच आता झेल सोडण्याची यशस्वीला शिक्षा मिळणार आहे आणि आजच्या सराव सत्रातून ते स्पष्ट झाले.