England vs India, 3rd Test at Lord's, London: पाचव्या दिवशी आम्ही नक्की जिंकू, असा दावा करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने माती खाल्ली. जोफ्रा आर्चरला विकेट देऊन तो माघारी परतला अन् नंतर सारेच गणित बिघडले. इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीवर विजयाच्या दिशेने कूच करताना मालिकेत २-१ अशा आघाडीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. भारत पराभूत झाल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC ) गुणतालिकेत त्यांना धक्का बसेल.