England vs India, 3rd Test at Lord's, London: लॉर्ड्सवर तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने भेदक मारा करून इंग्लंडच्या धावगतीवर लगाम लावला. नाणेफेक गमावल्यानंतरही भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना फारसी संधी दिली नाही आणि त्यांना दिवसअखेर ४ बाद २५१ धावांपर्यंत समाधान मानायला लावले. मात्र, टीम इंडियासाठी एक मोठी चिंता समोर आली आहे. रिषभ पंतला ( Rishabh Pant ) काल दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले होते आणि त्याने माघार घेतल्यास काय?