England vs India, 3rd Test at Lord's, London: लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत-इंग्लंड दोघांनी तोडीसतोड खेळ केला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन पहिल्याच दिवशी ४०० धावा करण्याच्या इराद्याने उतरलेल्या इंग्लंडच्या बॅझबॉलची भारतीय गोलंदाजांनी हवा काढली. पण, जो रूट ( Joe Root) जबरदस्त खेळला आणि त्याने दुसऱ्या दिवशी पहिली धाव घेत शतक पूर्ण केले.