England vs India, 3rd Test at Lord's, London: क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्सवर भारत-इंग्लंड यांच्यातल्या कडव्या स्पर्धेला आजपासून सुरुवात होतेय.. लीड्सनंतर टीम इंडियाने केलेले पुनरागमन ही यजमान इंग्लंडला खणखणीत चपराक होती. त्यामुळे ते आता ताकही फुंकून पिण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी जोफ्रा आर्चरला चार वर्षानंतर कसोटीत समावेश करून घेतले आणि त्याचा वेग लॉर्ड्सवर टीम इंडियाला कात्रित पकडेल, असे स्वप्न ते पाहत आहेत. त्यासाठीच त्यांनी लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर गवत ठेवले आहे. पण, त्यांचा हा डाव जसप्रीत बुमराह, आकाश दीप व मोहम्मद सिराज त्यांच्यावरच उलटवू शकतात. त्यामुळेच या कसोटीची सर्वांना उत्सुकता आहे.