Ind vs ENG 4th Test : पहिला डाव भुताचा! पदार्पण सामन्यात आकाश दीपने साहेबांना आणलं रडकुंडी

Ind vs ENG 4th Test Akash Deep News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे.
Akash Deep Ind vs ENG 4th Test Marathi News
Akash Deep Ind vs ENG 4th Test Marathi NewsEsakal

Akash Deep Ind vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगाल संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा युवा वेगवान गोलंदाज आकाश दीप याला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

आकाश दीपने त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात एक मोठी चूक होती, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. आकाशदीपने इंग्लिश सलामीवीर जॅक क्रॉलीला डावाच्या चौथ्या षटकात क्लीन बोल्ड केले. जॅक क्रोली 'आऊट' झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे जात असताना अंपायरने त्याला रोखले. कारण आकाशदीपचा हा चेंडू 'नो बॉल' होता.

Akash Deep Ind vs ENG 4th Test Marathi News
Ind vs Eng : इंग्लंडचा स्टार खेळाडू अचानक भारत गेला सोडून...! संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण

पण त्यानंतर रांचीमध्ये चौथ्या कसोटी सामन्यात आकाश दीपचा कहर पाहायला मिळत आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडच्या तीन दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. आकाशने आधी बेन डकेटला आऊट केले, त्याला 11 धावा करता आल्या. त्यानंतर त्याच षटकात फलंदाजीला आलेला ओली पोप षटकाच्या चौथ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट केल. पोप यांना खातेही उघडता आले नाही. आकाशने इंग्लंडच्या डावातील दहाव्या षटकात दोन विकेट घेतल्या.

आकाश दीपने यानंतर त्याची पहिली चूक सुधारली, आणि इंग्लंडच्या डावाच्या 12व्या षटकात जॅक क्रॉलीला क्लीन बोल्ड केले. त्याने शानदार शैलीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आणि इंग्लंड संघाला रांची कसोटीत पहिल्या तासातच रडकुंडी आणलं.

Akash Deep Ind vs ENG 4th Test Marathi News
Who Is Akash Deep : बिहारच्या पठ्ठ्याला कोच द्रविडने दिली टीम इंडियाची कॅप! संघात फक्त एकच बदल

कसोटी मालिकेत निवड होण्यापूर्वी आकाशने भारत अ संघासाठी चमकदार कामगिरी केली होती. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन सामन्यात 10 विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने 30 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 23.58 च्या सरासरीने 104 बळी घेतले आहेत.

आकाशदीपला तिसऱ्यांदा टीम इंडियाकडून कॉल आला. सर्व प्रथम 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्याची टी-20 संघात निवड झाली आणि त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात बोलावण्यात आले. पण त्यावेळी त्याने पदार्पण केलं नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com