Ind vs Eng 4th Test Day 4 : संयमी शुभमनला मिळाली ध्रुवची सॉलिड साथ! मालिका भारताच्या खिशात

India vs England 4th Test Day 4 Scorecard Updates : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला गेला.
India vs England 4th Test Marathi News
India vs England 4th Test Marathi News

India vs England 4th Test : भारताने 3-1 ने मालिका घातली खिशात

India vs England 4th Test Day 4 Live Score News : भारताने चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दिलेले 192 धावांचे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार करत मालिका खिशात टाकली. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने 84 धावांची सलामी दिली. मात्र इंग्लंडच्या फिरकीपटूंनी त्यानंतर भारताची अवस्था 5 बाद 120 धावा अशी केली होती. मात्र शुभमन गिलने संघ अडचणीत सापडला असताना संयमी अर्धशतकी खेळी केली. त्याला ध्रुव जुरेलने उत्तम साथ देत 39 धावा करत 72 धावांची भागीदारी रचली.

Ind vs Eng 4th Test Day 4 Live : शुभन गिलने सुरू फिनिशिंग गेम, दोन षटकार मारत अर्धशतक पूर्ण

भारताचा विजय टप्प्यात आल्यानंतर 119 चेंडू शांत असलेल्या शुभमन गिलने दोन षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने तोपर्यंत एकही चौकार मारला नव्हता.

Ind vs Eng 4th Test Day 4 Live : शुभन गिलने सुरू फिनिशिंग गेम, दोन षटकार मारत अर्धशतक पूर्ण

Ind vs Eng 4th Test Day 4 Live : गिलला मिळाली जुरेलची साथ; भारत 150 पार!

सर्फराज बाद झाल्यानंतर आलेल्या ध्रुव जुरेलने शुभमन गिलला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी रचत भारताला 150 धावांच्या पार पोहचवले.

Ind vs Eng 4th Test Day 4 Live : लंचनंतर निम्मा संघ गारद; टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या

लंचनंतर भारताने 118 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. मात्र बशीरने भारताला पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने रविंद्र जडेजाला 4 तर सर्फराज खानला शुन्यावर बाद करत हॅट्ट्रिक चान्स निर्माण केला.

Ind vs Eng 4th Test Day 4 Live : गिल अन् जडेजाने डाव सावरला; लंचसाठी खेळ थांबला

भारताची अवस्था 3 बाद 100 धावा अशी झाली असताना शुभन गिल आणि रविंद्र जडेजाने डाव सावर भारताला लंचपर्यंत 118 धावांपर्यंत पोहचवले. भारताला विजयासाठी अजून 74 धावांची गरज आहे.

Ind vs Eng 4th Test Day 4 Live : भारताला मोठा झटका, रोहित पाठोपाठ पाटीदारही पॅव्हेलियनमध्ये

रोहित बाद झाल्यानंतर आलेला पाटीदारी देखील शुन्यावर बाद झाला. भारताची अवस्था 1 बाद 99 धावांवर 3 बाद 100 धावा अशी झाली. भारताला विजयासाठी अजून 92 धावांची गरज आहे.

Ind vs Eng 4th Test Day 4 Live : भारताला मोठा झटका, रोहित शर्मा मोक्याच्या क्षणी बाद

इंग्लंडच्या टॉम हार्टलीने भारताचा कर्णधार रोहित शर्माला 55 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. भारताने 99 धावांवर दुसरी विकेट गेली. भारताला विजयासाठी अजून 93 धावांची गरज आहे.

Ind vs Eng 4th Test Day 4 Live : रोहित शर्माचे अर्धशतक

यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर रोहितने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत अर्धशतकी खेळी केली. याचबरोबर भारत देखील शतकाच्या जवळ पोहचला.

Ind vs Eng 4th Test Day 4 Live : भारताला पहिला धक्का यशस्वी झाला बाद 

अखेर इंग्लंडने सेट झालेली भारताची सलामी जोडी फोडली. जो रूटने यशस्वी जैस्वालला 37 धावांवर बाद केलं.

Ind vs Eng 4th Test Day 4 Live : रोहितच्या षटकाराने भारताचे अर्धशतक पूर्ण, रोहितने गिअर बदलला

रोहित शर्माने जेमी अँडरसनला षटकार मारत भारताचे अर्धशतक धावफलकावर लावलं. भारत अजूनही 135 धावांनी पिछाडीवर आहे. भारताच्या 57 धावा झाल्या होत्या.

रांचीमध्ये टीम इंडियात रचणार इतिहास, टीम इंडिया विजयापासून 152 पावले दूर

2022 मध्ये इंग्लंड कसोटी संघाची कमान कर्णधार म्हणून बेन स्टोक्स आणि कोच म्हणून ब्रेंडन मॅक्युलम यांनी सांभाळली. त्यानंतर या संघाने एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. अशा परिस्थितीत बॅझबॉलला प्रथमच गुडघ्यावर आणण्याची भारताला मोठी संधी आहे. या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. जर टीम इंडियाने रांचीमध्ये विजय मिळवला तर ते मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com