जो रूटच्या १५० धावांच्या खेळीने इंग्लंड मजबूत स्थितीत
भारताच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने २०० हून अधिक धावांची घेतली आघाडी
कर्णधार बेन स्टोक्सचे पाच विकेट्सनंतर खणखणीत शतक
England vs India, 4th Test at Manchester Marathi News : इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याचं आव्हान टीम इंडियाला मँचेस्टर कसोटीच्या चौथ्या दिवशी पेलावे लागणार आहे. जो रूटच्या १५० धावांनी आधीच भारतीय गोलंदाजांच्या मनोबलाच्या चिंधड्या उडवल्या असताना कर्णधार बेन स्टोक्सनेही दमदार खेळी केली आहे. एकाच कसोटीत शतक अन् पाच विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला कर्णधार ठरला.