
भारत-इंग्लंड चौथी कसोटी मँचेस्टर येथे खेळवली जातेय
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुनरागमनासाठी सज्ज
इंग्लंडकडे मालिकेत २-१ अशी आघाडी
England vs India, 4th Test at Manchester Live : दुखापतीचं ग्रहण सोडवून भारतीय संघ चौथ्या कसोटीत इंग्लंडला टक्कर देण्यासाठी मैदानावर उतरला आहे. कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एडबॅस्टन कसोटीत पुनरागमन केले होते आणि तसेच पुनरागमन मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर अपेक्षित आहे. नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग व आकाश दीप यांच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार हे निश्चित होते.