
भारत-इंग्लंड पाचवी कसोटी उद्यापासून दी ओव्हलवर
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने खांद्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली
इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल
England Captain Ben Stokes Ruled Out of Final Test Against India : इंग्लंडच्या संघाला पाचव्या कसोटीच्या आदल्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने दी ओव्हल कसोटीतून माघार घेतली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बुधवारी पाचव्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आणि त्यात चार बदल करण्यात आले आहे. भारत या मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे आणि बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत भारताला पाचवी कसोटी जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्याची आयती संधीच मिळाली आहे.