गौतम गंभीर आणि ओव्हल क्युरेटर ली फॉर्टीस यांच्यात काल तीव्र वाद झाला.
ग्राउंड्समनने भारतीय संघाला खेळपट्टीपासून 2.5 मीटर लांब राहण्यास सांगितले
इरफान पठाणने फॉर्टीसच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश केला
Oval pitch drama viral photo Irfan Pathan Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि दी ओव्हलचे क्युरेटन ली फॉर्टीस यांच्यात काल जोरदार भांडण झालं. भारत-इंग्लंड यांच्यातला पाचवा कसोटी सामना दी ओव्हलवर उद्यापासून खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली. काल भारतीय संघ सराव करत असताना गंभीर आणि फॉर्टीस यांच्यात वाद झाल्याचा Video Viral झाला. त्यानंतर आता भारताचे माजी खेळाडू एकवटले आहेत आणि त्यांनी पुराव्यासह घेरले आहे.