भारत-इंग्लंड कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली
मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांच्या कामगिरीमुळे भारताने पाचवी कसोटी जिंकली
शुभमन गिल व हॅरी ब्रूक यांना मालिकावीर या पुरस्काराने गौरविण्यात आले
IND vs ENG 2025 Player of the Series award controversy : भारत-इंग्लंड यांच्यातली अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठीची पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. भारताने ओव्हल कसोटीत ६ धावांनी रोमहर्षक विजयाची नोंद करताना संयुक्त जेतेपद पटकावले. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. लॉर्ड्सवर भारताला २२ धावांनी पराभव पत्करावा लागला, तेव्हा सिराजची दुर्दैवी विकेट पडली होती. ते दुःख त्याला सतावत होते आणि त्याने आजचा सामना जिंकून देऊन कटू आठवणी पुसून टाकल्या.