रवींद्र जडेजाने ७४ चेंडूंत ५३ धावांची खेळी केली
भारताने दुसऱ्या डावात ३२४ धावांची आघाडी घेतली
सर जडेजाने असा विक्रम नोंदवला जो एकाही भारतीयाला जमला नव्हता
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारतीय संघाने पाचव्या कसोटीत इंग्लंडसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. यशस्वी जैस्वाल आणि आकाश दीप यांच्या १०७ ( १५० चेंडू) धावांच्या भागीदारीने टीम इंडियाला ऊर्जा दिली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनीही योगदान देताना इंग्लंडला हैराण केले. रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) अर्धशतक झळकावताना एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. व्ही व्ही एस लक्ष्मणसारख्या दिग्गजालाही हे जमले नव्हते.