IND vs ENG 5th Test: भारताने रचला विजयाचा पाया; यशस्वी जैस्वालच्या शतकाने इंग्लंडची भंबेरी, उभं केलं गाठता न येणारं लक्ष्य

India vs England 5th Test Marathi Cricket News: भारताने ओव्हलच्या मैदानावर विजयाचा भक्कम पाया रचला. यशस्वी जैस्वालच्या तडाखेबाज शतकाने इंग्लंडला गोंधळून सोडलं, तर रवींद्र जडेजा आणि आकाश दीप यांनी जबरदस्त अर्धशतकं झळकावत डावाची भिंत अधिक मजबूत केली.
India vs England 5th Test Marathi Cricket News
India vs England 5th Test Marathi Cricket NewsESAKAL
Updated on

England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारत-इंग्लंड यांच्यातली पाचवी कसोटी रोमांचक वळणावर आहे. इंग्लंडने पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी गमावली आणि तेच पहिल्या डावात ढेपाळलेली टीम इंडियाने दुसऱ्या डावात जबरदस्त खेळ केला. यशस्वी जैस्वालच्या शतकाला, आकाश दीप,, वॉशिंग्टन सुंदर व रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांची साथ मिळाली. इंग्लंडसमोर तगडे आव्हान उभे करण्यात भारताला यश आले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा इंग्लंडने १ बाद ५० धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी ३२४ धावांची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com