Sunil Gavaskar celebrates India’s Oval Test win in lucky jacket : भारतीय संघाने दी ओव्हल कसोटीत अविस्मरणीय विजय मिळवला अन् लिटल मास्टर सुनील गावस्कर यांचा आनंद गगनाला भिडला. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत समालोचन करणाऱ्या गावस्करांनी विजयानंतर त्यांच्या 'लकी जॅकेट' चा उल्लेख करून सेलिब्रेशन केलं. भारतीय संघाने पाचवी कसोटी इंग्लंडच्या जबड्यातून खेचून आणली. पाचव्या दिवशी चार विकेट्स हातात असताना इंग्लंडला केवळ ३५ धावाच करायच्या होत्या, तरीही ते ६ धावांनी हरले आणि भारताने मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.