Gautam Gambhir’s surprising U-turn on Shreyas Iyer’s Test omission
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात श्रेयस अय्यरचं ( Shreyas Iyer) नाव नसल्याचे सर्वांना आश्चर्य वाटले आहे. त्यावरून बरीच चर्चा झाली, निवड समिती प्रमुख अजित आगरकरने त्यामागचे कारणही सांगितले. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसमोर जेव्हा हा प्रश्न आला, तेव्हा मी सिलेक्टर नाही असे तो म्हणाला. पण, काल इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत त्याचा सूर बदललेला दिसला आणि मतही वेगळे होते. त्यामुळे गौतम गंभीरने यू टर्न मारल्याची चर्चा सुरू झाली आहे.