
भारत-इंग्लंड पाचवी कसोटी ३१ जुलैपासून द ओव्हल येथे होणार असून मालिका २-२ ने बरोबरीत आणण्याची भारताला संधी आहे.
जसप्रीत बुमराहच्या उपलब्धतेबाबत संभ्रम असून तो पाचवी कसोटी खेळेल का यावर निर्णय अद्याप झालेला नाही.
गौतम गंभीरने स्पष्ट केले की सर्व भारतीय वेगवान गोलंदाज तंदुरुस्त आहेत आणि निवडीसाठी उपलब्ध आहेत.
GAUTAM GAMBHIR SPEAKS ON JASPRIT BUMRAH’S 5TH TEST AVAILABILITY: भारताने चौथी कसोटी ड्रॉ राखून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अजूनही शर्यतीत असल्याचे सिद्ध केले. भारत-इंग्लंड यांच्यातला पाचवा कसोटी सामना ३१ जुलैपासून दी ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे आणि ही कसोटी जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्याची शुभमन गिल अँड टीमला संधी आहे. पण, या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार का? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत जसप्रीत फक्त तीन मॅच खेळेल, हे आधीच स्पष्ट होते. त्यामुळेच पाचव्या कसोटीबाबत त्याच्या उपलब्धतेबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने मोठं विधान केलं आहे.