रिषभ पंतच्या दुखापतीनंतर क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा बदली खेळाडूच्या नियमाची चर्चा सुरू झाली आहे.
सुनील गावस्कर, गौतम गंभीर आणि मायकल वॉन यांनी या नियमाला समर्थन दिले आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स या संकल्पनेला 'हास्यास्पद' म्हणत विरोध करतो.
Injury sub debate: Gambhir vs Stokes reaction after 4th Test : रिषभ पंतच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा बदली खेळाडूचा मुद्दा चर्चेत आला आहे. Rishabh Pant ला कसोटीच्या पहिल्या दिवशी रिव्हर्स स्वीप मारताना पायाला दुखापत झाली आणि त्याला 'मेटाटार्सल फ्रॅक्चर' झाल्याचे सांगण्यात आले. तरीही तो फलंदाजीला आला आणि अर्धशतकीय योगदान देऊन परतला. त्यानंतर दुखापतग्रस्त खेळाडूच्या बदली खेळाडूच्या मुद्यावरून क्रिकेटमध्ये दोन गट पडल्याचे दिसतेय.