भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेत नेहमीच उत्साह, रोमांच पाहायला मिळतो. पण, रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीमुळे भारतीय चाहत्यांचा रस काहीसा कमी झाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची चर्चा आहे. २३ मे रोजी या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर होईल. या मालिकेच्या निमित्ताने विराट व जो रूट या फॅब फोअरमधील दोन खेळाडूंची स्पर्धा पाहता येणार नाही. जो रूटला या मालिकेत वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.