Sanju Samson : भाई, दो सेंच्युरी मिस नाही झाल्या... ९७ अन् ८९ धावा केल्यात; संजू सॅमसनची भन्नाट पत्रकार परिषद Video Viral

Sanju Samson reply on missing two centuries press conference: भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन सध्या आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत आहे. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला की, “तू सलग दोन डावांत शतकाच्या अगदी जवळ येऊनही शतक पूर्ण करू शकला नाहीस. याबद्दल तुला काय वाटते?”
Sanju Samson delivered a brilliant response in the press conference

Sanju Samson delivered a brilliant response in the press conference

esakal

Updated on

Sanju Samson response to media question about century: संजू सॅमसनने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा मॅच विनिंग खेळी केली. वेस्ट इंडिजविरुद्ध करो वा मरो लढतीत संजू मैदानावर शड्डू ठोकून उभा राहिला आणि नाबाद ९७ धावा करून संघाला विजयासह उपांत्य फेरीत घेऊन गेला. काल उपांत्य फेरीच्या लढतीतही त्याने ८९ धावांची खेळी केली आणि इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. संजूचा हा फॉर्म जेवढा त्याला सुखावणारा आहे, तेवढाच तो त्याच्या चाहत्यांसाठीही महत्त्वाचा आहे. पण, त्याची शतक हुकल्याची सल सर्वांना आहेच.. हाच प्रश्न जेव्हा संजूला विचारला गेला, तेव्हा त्याने दिलेले उत्तर मजेशीर होते...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com