Indian players react after dropping a catch during the T20 World Cup 2026 match.
esakal
IND vs ENG semifinal preview fielding concerns explained : गतविजेता भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज इंग्लंडचा सामना करणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सलग तिसऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होतोय. सुपर ८ गटात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करावी लागली, परंतु पुढील लढतीत झिम्बाब्वे व वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने उपांत्य फेरी गाठली. पण, त्यांना अपेक्षित वर्चस्व गाजवता आलेलं नाही. घरच्या मैदानावर खेळूनही भारतीय संघ 'दादा' सारखा खेळलेला नाही.