Sanju Samson praises Jasprit Bumrah after receiving the Player of the Match award in India’s big T20 World Cup clash.
esakal
Sanju Samson gives Player of the Match credit to Jasprit Bumrah: भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलग दोन पर्वात फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा पाकिस्तान ( २००७ व २००९) आणि श्रीलंका ( २०१२ व २०१४) यांच्यानंतर तिसरा संघ ठरला. पण, पहिल्यांदा गतविजेता संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताच्या ७ बाद २५३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने उपांत्य फेरीच्या या सामन्यात ७ बाद २४६ धावा केल्या. जेकब बेथलच्या १०५ धावांच्या खेळीने भारताला शेवटपर्यंत संघर्ष करायला भाग पाडले. ८९ धावांची खेळी करणारा संजू सॅमसन प्लेअर ऑफ दी मॅच ठरला.