
Abhishek Sharma Tanya Singh Case: भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल वादळी खेळी केली. त्याच्या १३५ धावांच्या खेळीने भारताला २४७ धावांपर्यंत पोहोचवले आणि त्यानंतर इंग्लंडचा संपूर्ण संघ ९७ धावांत तंबूत परतला. भारताने १५० धावांनी मिळवलेला विजय, हा इंग्लंडविरुद्धचा ट्वेंटी-२०तील सर्वात मोठा विजय ठरला. अभिषेकने ५४ चेंडूंत ७ चौकार व १३ षटकारांसह १३४ धावांची खेळी केली आणि नंतर गोलंदाजीत दोन विकेट्सही घेतल्या. अभिषेकची खेळी पाहून वानखेडेवर उपस्थित सर्व सेलेब्रिटींनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. आज च्या अभिषेकसाठी टाळ्या वाजवल्या जात आहेत, त्याच फलंदाजाकडे मागच्या वर्षी बोटं दाखवली गेली होती. काय होतं ते प्रकरण अन् कोण होती ती मॉडेल?