IND vs ENG : तो परतला... भारतीय संघाची ताकद वाढली, इंग्लंडची भलतीच कोंडी झाली! पहिल्याच सराव सत्रात नेमकं काय घडलं?

India vs England T20I series practice session updates: इंग्लंडविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघाने जोरदार तयारीला सुरुवात केली असून संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Varun Chakravarthy joins Team India ahead of England T20I series

Team India star player return

esakal

Updated on

Varun Chakravarthy joins Team India ahead of England T20I series: भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला १ जुलैपासून सुरूवात होत आहे आणि भारतीय संघ डरहॅम येथे दाखल झाला आहे. भारतीय संघाचे आज पहिले सराव सत्र पार पडले आणि त्यात एका चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची चर्चा रंगणार यात, दुमत नाही. पण, आज जो खेळाडू भारताच्या सराव सत्रात दिसला, त्याला पाहून साऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. त्याचवेळी इंग्लंडच्या ताफ्यात टेंशन वाढणार हे नक्की झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com