Gambhir’s strict orders to Pant after century celebration : भारतीय संघाला पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकताना पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून एडबस्टन येथे सुरू होणार आहे. लीड्सवर भारत हरला असला तरी यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याने दोन्ही डावांत शतक झळकावून मॅच गाजवली. त्यात शतकानंतरचे त्याचे कोलांटीउडी मारून सेलिब्रेशन करण्याची पद्धत अनेकांना आवडली. पण, गौतम गंभीरने त्याला यापुढे हे सेलिब्रेशन करू नको असे सांगितले आहे.