भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली
मोहम्मद सिराजने पाचव्या कसोटीत एकूण ९ विकेट्स घेतल्या
कर्णधार शुभमन गिल मालिकावीराच्या पुरस्काराचा मानकरी ठरला
England vs India Test Series Analysis: रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन या दिग्गजांच्या कसोटीतील निवृत्तीनंतर टीम इंडियाला इंग्लंड दौरा जड जाईल... शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा पहिलाच कसोटी दौरा आहे आणि त्याचा कस लागेल... गौतम गंभीरने निवडलेला संघ इंग्लंडसमोर ढेपाळेल... जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड व्यवस्थापनाचा मुद्दा... अशा अनेक चर्चांनी India vs England कसोटी मालिका गाजली. पण, आज ओव्हलच्या मैदानावर टीम इंडियाने थरारक विजयाची नोंद करून सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. भारताने ही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली आणि या मालिकेत ९ खेळाडूंनी आपली छाप पाडली.