Why did Shubman Gill withdraw from India A squad ahead of England tour : भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे. त्यासाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील १८ सदस्यीय संघ BCCI ने नुकताच जाहीर केला. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंड दौऱ्यावर युवा टीम इंडियाची खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळेच या संघात निवड झालेल्या खेळाडूंना इंग्लंडच्या खेळपट्टींचा सराव व्हावा, यासाठी भारत अ संघासोबत काही खेळाडू आधीच इंग्लंडला रवाना होणार आहेत. भारताचा नवा कर्णधार शुभमन गिलही ६ जूनपूर्वी इंग्लंडला दाखल होण्याची शक्यता होती, परंतु त्याने भारत अ संघातून नाव मागे घेतले आहे.