Yashasvi Jaiswal Eyes Shahid Afridi’s World Record : भारतीय संघाला पहिल्या कसोटीत पाच शतकं होऊनही इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. भारत-इंग्लंड यांच्यातल्या मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली सुरुवात केली, परंतु त्यांना विजयापासून वंचित रहावे लागले. आता दुसरी कसोटी २ जुलैपासून एडबस्टन येथे होणार आहे आणि इथे टीम इंडियाला आतापर्यंत एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे टीम इंडियासमोर मोठं आव्हान असणार आहे. पण, पहिल्या सामन्यातील शतकवीर यशस्वी जैस्वाल याला या कसोटीत दोन वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्याची संधी आहे.