IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

Ireland vs India, 1st T20I Marathi Cricket News: भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी सर्वांचे लक्ष १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडे लागले होते. मात्र चाहत्यांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
Why Vaibhav Sooryavanshi did not make India debut

Why Vaibhav Sooryavanshi did not make India debut

esakal

Updated on

Ireland vs India, 1st T20I Marathi Cricket Updates: वैभव सूर्यवंशीचे पहिल्या सामन्यातून पदार्पण होणार का? तो भारताकडून पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरणार का? याच चर्चांभवती भारत-आयर्लंड मालिका फिरणार आहे. आयपीएल २०२६, गाजवल्यानंतर वैभवला भारताच्या सीनियर संघात संधी मिळावी, अशी जोरदार मागणी झाली आणि त्याची निवडही करण्यात आली. पण, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासाठी कोणाला बाहेर काढले जाईल, हा खरा पेच निर्माण झाला आहे. संजू सॅमसन, हो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ चा हिरो ठरला अन् अभिषेक शर्मा जो जागतिक क्रमवारीत नंबर १ ट्वेंटी-२० फलंदाज आहे. यांना तर बाहेर बसवलं जाऊ शकत नाही.. मग कोण?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com