Shreyas Iyer explains Vaibhav Sooryavanshi omission
esakal
Why Vaibhav Sooryavanshi was not selected in playing XI? भारत-आयर्लंड मालिका ही वैभव सूर्यवंशी भवती चर्चेत होती... त्याला पहिल्या ट्वेंटी-२०त पदार्पणाची संधी मिळेल असे वाटत असताना नवीन कर्णधार श्रेयस अय्यरने १५ वर्षीय खेळाडूला बाकावर बसवण्याचेच ठरवले. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली असली तरी कर्णधाराने त्यामागचं कारणही समजावून सांगितले. आयपीएल आणि युवा क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतर वैभवला भारतीय संघात स्थान मिळाले असले, तरी आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी त्याला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता उर्वरित सामन्यांमध्ये त्याला संधी मिळते का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.