Vaibhav Sooryavanshi
esakal
IND vs IRE 1st T20I Vaibhav Sooryavanshi milestones: भारत-आयर्लंड यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होतेय आणि पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची सर्वांना प्रतीक्षा आहे. वैभवला पदार्पणाची संधी मिळाल्यास तो भारताकडून पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरेल.. हा एकच रेकॉर्ड आतापर्यंत सर्वांना माहीत होता. पण, तो मैदानावर उतरताच त्याला पाच आणखी मोठे विक्रम खुणावत आहेत. तो मैदानावर पाऊल ठेवताच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरपासून ते सध्याचा महान खेळाडू रोहित शर्मापर्यंत अनेकांचे ऐतिहासिक विक्रम मोडू शकतो.